Home गुन्हा दारू नव्हे, तर बिल सोशल मीडियावर टाकणे पडले महागात; वाचा सविस्तर

दारू नव्हे, तर बिल सोशल मीडियावर टाकणे पडले महागात; वाचा सविस्तर

लॉकडाऊनमध्ये सरकारने काही अटींसह वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. एका तळीरामाने तब्बल 52 हजार 841 रुपयांची दारू विकत घेतली. पण त्याचे बिल सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागात पडले आहे. पोलीस आता या तळीरामाचा शोध घेत आहे.

कर्नाटकात एका व्यक्तीने 52 हजार 841 रुपयांचा दारू विकत घेतली. त्यात 13.5 लिटर दारू आणि तब्बल 35 लिटर बियर होती. लॉकडाऊनमध्ये नियम आहे की एका व्यक्तीला 18 लिटर बीयर आणि 2.6 लिटर देशी दारू विकण्यास परवानगी आहे. मग विक्रेत्याने नियम उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दुकानदाराची चौकशी केली.

दारू घेणारे 8 जण होते पण त्यांनी एकाच कार्डने बिल भरल्याचे दुकानदाराने दिले आहे. आता पोलीस या ग्राहकाचा शोध घेत आहेत. कर्नाटकात एकाच दिवशी 45 कोटींची दारू विक्री झाली आहे.