Home बातम्या ऐतिहासिक दिलखुलास’ कार्यक्रमात पांडुरंग तावरे यांची मुलाखत

दिलखुलास’ कार्यक्रमात पांडुरंग तावरे यांची मुलाखत

0
दिलखुलास’ कार्यक्रमात पांडुरंग तावरे यांची मुलाखत

मुंबई, दि. 13 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात  बारामती येथील प्रगतीशील शेतकरी तसेच राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. १४ मे, सोमवार दि. १६ मे व मंगळवार दि. १७ मे २०२२ रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

16 मे च्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद 2022 चे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शेती अर्थव्यवस्थेचे संपूर्ण गणित बदलविण्याची क्षमता असलेले कृषी पर्यटन, त्याची संकल्पना, त्याचा शेतकऱ्यांना आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला होत असलेल्या लाभाबाबत श्री. तावरे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.