मुंबई, दि.18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 21 आणि मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाचा गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग, महामंडळाची एकूण वाटचाल, महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश, एक खिडकी योजना, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि पर्यटन अशा विविध विषयांवर व्यवस्थापकीय संचालक डॉ. ढाकणे यांनी विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000