मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘संकल्प वृक्षलागवडीचा’ या विषयावर वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून ६, ८, ९ आणि १० जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी शिंदे–चैागुले यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वन विभागामार्फत १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात राज्यात सुरू झालेला वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम, महाराष्ट्रातील अत्यल्प वनक्षेत्र असलेल्या भागातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना,वन विभागाचा वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, वृक्ष लागवडीच्या यावर्षी राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबतची माहिती श्री. खारगे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.