Home शहरे अकोला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १० एप्रिलला मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

‘दिलखुलास’ कार्यक्रमात १० एप्रिलला मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात १० एप्रिलला मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळ व शासनाच्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.

राज्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्यानिमित्ताने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील व मीनल जोगळेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

०००