‘दिलखुलास’ कार्यक्रमात युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण रामेश्वर सब्बनवाड यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण रामेश्वर सब्बनवाड यांची मुलाखत
- Advertisement -

मुंबई, दि. १५ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षेत दुसऱ्यांदा यश मिळविलेल्या रामेश्वर सब्बनवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 16 जून व शुक्रवार 17 जून व शनिवार 18 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या यशस्वी विद्यार्थ्यांकडे बघितले तर ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या लक्षणीय दिसून येते. अपार मेहनतीची तयारी आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे या विद्यार्थ्यांच्या यशाकडे बघितले तरी जाणवते. लातूर जिल्ह्यातील हंडरगुळी गावात जन्मलेल्या रामेश्वर सब्बनवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वप्ने बघा, साकार होतात हाच संदेश दिला. त्यांच्या या यशाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००

- Advertisement -