
मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 20, बुधवार दि. 21, गुरूवार दि. 22, शुक्रवार दि. 23 आणि शनिवार दि. 24 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारण होणार असून या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी तसेच दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 27 मे 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. निवेदक निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
मुलाखतीच्या पहिल्या भागात अवैध मासेमारीच्या नियंत्रणासाठी ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा, मत्स्यव्यवसायाला देण्यात आलेला कृषीचा दर्जा, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर, मासेमारी तलावांचे ‘डिजिटलायझेशन’, मच्छिमार संस्थांना समन्यायी पध्दतीने तलावांच्या वाटपाचे धोरण, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी अशा अनेक विषयांवर मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तरे दिली आहेत.
मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. यामध्ये पर्यटनवाढीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग, ‘गाळमुक्त नदी’ मोहिम, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन, सामान्य जनतेचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या ‘पालकमंत्री कक्षा’ची देखील सविस्तर माहिती मंत्री श्री. राणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
000000