दिलासादायक बातमी : मुंबईतून कधी हद्दपार होणार करोनाची दुसरी लाट? अभ्यासातून नवी तारीख समोर

दिलासादायक बातमी : मुंबईतून कधी हद्दपार होणार करोनाची दुसरी लाट? अभ्यासातून नवी तारीख समोर
- Advertisement -


हायलाइट्स:

  • नव्या संशोधनातून मुंबईकरांना मोठा दिलासा
  • दुसरी लाट लवकरच ओसरण्याचा अंदाज.
  • मुंबईतील शाळाही सुरू होण्याची वर्तवली शक्यता.

मुंबई : करोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेनंही मुंबईत थैमान घातलं. शहरात एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचे दररोज नवनवे उच्चांक समोर आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) स्थिती सुधारण्यास सुरुवात झाली असून रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. मात्र करोनाचा संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशातच आता एका नव्या अभ्यासातून मुंबईतील करोनाची लाट कधीपर्यंत ओसरणार, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढेल. सध्या सुरू असलेली लसीकरणाची गती लक्षात घेता मुंबईत लवकरच झपाट्याने करोना रुग्णांच्या संख्येत घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्च’मधील शास्रज्ञांच्या मतानुसार, १ जूनपर्यंत मुंबईतील स्थिती जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जशी होती, तशी होऊ शकेल.

…तर १ जुलैपर्यंत उघडणार मुंबईतील शाळा

मुंबईत सध्या वेगाने लसीकरण सुरू आहे. लसीकरणाच्या या प्रक्रियेत भविष्यात कोणतीही बाधा आली नाही आणि करोनाच्या आणखी कोणत्याही नव्या प्रकाराने शहरात शिरकाव केला नाही तर मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. परिणामी शहरातील शाळा १ जुलैपासून सुरू करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली असेल, असंही मत या शास्त्रज्ञांनी अभ्यासानंतर व्यक्त केलं आहे.

Rohit Pawar: रोहित पवार यांनी करोना बाधित रुग्णांना जेवण वाढले आणि…

दुसऱ्या लाटेचा मुंबईत धुमाकूळ

करोनाची दुसरी लाट मुंबई शहरात येऊन धडकल्यानंतर अत्यंत वेगाने या व्हायरसचा संसर्ग झाला होता. दुसऱ्या लाटेत मुंबईत जवळपास २ लाखांहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली. केवळ एप्रिल महिन्यातच तब्बल १ हजार ४७९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले. तर १ मे या एका दिवशी ९० जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

या सर्व पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाज मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. आगामी काही दिवसांत खरोखरंच शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

- Advertisement -