हायलाइट्स:
- दिलीप कुमार यांच्या जाण्याने नसीरुद्दीन शाह दुःखी
- दिलीप कुमार यांचं हिंदी चित्रपटसृष्टीसाठी योगदान नाही- नसीरुद्दीन शाह
- नवीन कलाकारांना दिलीप कुमार यांकडून कोणतीही मदत नाही
Video- कृष्णावतार साकारणाऱ्या अभिनेत्याची अशी झाली फजिती
वृत्तपत्रात नसीरुद्दीन यांनी दिलीप कुमार यांच्याबद्दल लिहिताना म्हटलं की, ‘दिलीप कुमार यांनी एक ज्येष्ठ अभिनेता या नात्याने नवीन कलाकरांना प्रोत्साहीत करण्यासाठी खास काहीच केलं नाही. त्यांच्या अभिनयामधील नाटकीपणा, शब्दांची धार, आवाजाचा रोख आणि सततचे हातवारे अभिनयाच्या नियमांचं पालन करत नव्हते. दिलीप कुमार यांच्या अनोख्या शैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन प्रथा सुरू केली. परंतु, त्यांच्या नंतर दिलीप कुमार यांप्रमाणे अभिनय करणाऱ्या कलाकारांना मात्र ते जमलं नाही. ते दिलीप कुमार यांची नक्कल करत आहेत असंच वाटत राहिलं.’
दिलीप कुमार यांनी अभिनयाशिवाय काहीच केलं नाही असं म्हणत नसीरुद्दीन यांनी लिहिलं, ‘इतके महान अभिनेते असूनही दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अभिनयाशिवाय काहीच केलं नाही. ते नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहिले. त्यांनी समाजातील अनेक घटकांना मदत केली. परंतु, आपल्या अभिनयाच्या अनुभवाचा उपयोग इतर कलाकारांसाठी केला नाही. त्यांनी फक्त एका चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. नवीन कलाकारांसाठी कोणत्याही प्रकारची मदत देऊ केली नाही. नवीन कलाकारांसाठी असं काहीच केलं नाही जे पाहून इतरांनी दिलीप कुमार यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.’
‘अंतवर्स्त्र घातली का?’ प्रश्न विचारण्याआधी हेमांगीची पोस्ट वाचा