
मुंबई, दि. १९: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०९ व्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी लोकभवन येथील अधिकारी कर्मचारी तसेच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना सामुहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची, तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद संविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जयराज कारभारी तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
००००

WhatsApp