दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली
- Advertisement -

          मुंबई, दि.२७: विधानसभेचे माजी आणि निकटच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावाला सभागृहाने संमती दिली. या सर्व माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृह अतीव दुःख व्यक्त करित आहे, अशा भावना अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडतांना व्यक्त केल्या.

लक्ष्मण पांडुरंग जगताप, विद्यमान विधानसभा सदस्य,  मोरेश्वर विठ्ठलराव टेमुर्डे, माजी विधानसभा उपाध्यक्ष, केशवराव शंकरराव धोंडगे, माजी लोकसभा सदस्य व माजी वि.स.स., डॉ.देवीसिंह रामसिंह शेखावत, सदाशिवराव शंकरराव माळी, उत्तमराव केशवराव पटवारी-भालेराव यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

000

राजू धोत्रे/वि.स.अ/

- Advertisement -