दिव्यांगांना मोफत आवश्यक साहित्य वाटप शिबिर संपन्न

- Advertisement -

रायगड : सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था यांच्यावतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई यांच्या सौजन्याने भारतीय नौवहन निगम लिमिटेड पोत वहन मंत्रालय मुंबई सीएसआर योजनेंतर्गत, वरसे ग्रुपग्रामपंचायत सभागृह वरसे रोहा रायगड येथे रोह्यात दिव्यांगांना आवश्यक सहाय्यक साहित्य मोफत वाटप शिबिर संपन्न झाले. यात दिव्यांगाना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कमोड व्हीलचेअर, श्रवणयंत्र, अंध काठी, अंध विद्यार्थीना स्मार्ट डिव्हाहीस अशा अनेक आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे दिपक जगतियानि सहाय्यक समन्वयक भारतीय नौवहन निगम लिमिटेड मुंबई यांनी दिव्यांगांना जे आवश्यक साहित्य दिले जात आहे. त्याचा व्यवस्थित वापर करावा तसेच अशाप्रकारे असणाऱ्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाथ पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना यांनी असे सांगितले की, रायगड जिल्ह्यातील दिव्यांग हा दुर्गम अशा ग्रामीण भागातील असून त्याना आवश्यक साहित्य लवकर उपलब्ध होत नाही. आपल्या या उपक्रमाद्वारे है साहित्य मिळणे सहज शक्य झाले आहे. याचा आदर्श रायगड जिल्ह्यातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा तसेच संजय मंडळ रिजनल अधिकारी अमिल्कौ मुंबई आणि कमलेश यादवी अमिल्कौ यांच्या टीम व शिवाजी पाटील सचिव सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था व टीम यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न झाला शिवाजी पाटील यांनी आभार व्यक्त केले. विशाल सोनकर आणि सुदाम माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

- Advertisement -