दिव्यांग व्यक्तींनी बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
- Advertisement -


मुंबई दि. ६ : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत दिव्यांगत्वाचा दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला एक लाखापर्यंत तहसिलदार यांचे कडून, रहिवाशी दाखला किंवा जागेचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड. दोन प्रतिष्ठीत व्यक्तीचे दाखले (नगरसेवक/संरपंच/ग्रामसेवक/एसईओ यांचेकडून) संबंधित व्यवसायाचे खरेदी कोटेशन १ लाख ५० हजार पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेचे नांव व शाखा, व्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट (सी. ए. कडील) ज्या जागेमध्ये व्यवसाय करणार आहे. त्या जागेचे बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड ऑफिसमधील नोंद कागदपत्रे/संमतीपत्र/भाडेप्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायन्सेस इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ७१ येथे संपर्क साधावा. योजनांचे अर्ज या कार्यालयात उपलब्ध आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

 



Source link

- Advertisement -