Home शहरे अकोला दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत आढावा

दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत आढावा

दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत आढावा


मुंबई, दि. १८ : दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या मालकीच्या मानखुर्द व बोर्ला येथील जमिनीची हद्द निश्चित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे दिले.

चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या अधिनस्त असलेल्या मानखुर्द व बोर्ला येथील जागेच्या अतिक्रमण संदर्भात आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, मानखुर्द येथील संस्थेच्या जमिनीवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण असून, काही जमिनी विविध संस्थांना भूसंपादनाद्वारे हस्तांतरित करण्यात आल्या असल्या तरी संबंधित नकाशे व अभिलेख उपलब्ध नसल्याने अचूक हद्द निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी अनधिकृत बांधकामे व बेकायदेशीर व्यवसाय वाढून बालगृहातील बालकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत आहे.

बोर्ला येथील संस्थेच्या जागेवरही मोठ्याप्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्याने मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 2016-17 मध्ये अतिक्रमण हटविण्यात आले होते; मात्र कोविडनंतर पुन्हा मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नुकत्याच झालेल्या पाहणीत नव्याने 50 ते 60 अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे आढळून आले. यामुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मानखुर्द व बोर्ला येथील संस्थेच्या जमिनींची भूमापन विभागामार्फत तातडीने मोजणी करून अचूक हद्द निश्चित करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 



Source link

error: Content is protected !!
WhatsApp chat