दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटनपटू आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या वडिलांसह तिची आई आणि बहीण अनिशाची तब्येत ठीक नसल्याने आणि त्यांना करोनाच्या सौम्य लक्षणांची जाणीव झाल्याने त्यांनी करोना चाचणी करून घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिघांनीही स्वतःला राहत्या घरी क्वारंटाइन करून घेतले होते. परंतु, काही दिवस उलटूनही प्रकाश यांचा ताप उतरला नाही तेव्हा त्यांना बंगळुरू मधील एका हॉस्पिटलमध्ये भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. तर दीपिकाची आई उजाला पदुकोण आणि बहीण अनिषा घरात क्वारंटाईन आहेत.या तिघांनंतर दीपिकाची करोना टेस्ट करण्यात आली. तिच्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या चौघांनाही करोनाची लागण झाली आहे.
दीपिकाने अलिकडेच मानसिक आरोग्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. तिने सांगितले होते की, करोनाच्या या संकटकाळामध्ये प्रत्येकाने आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याबाबतही सजग रहायला हवे. मानसिक पातळीवरही सक्षम राहणे ही आताच्या काळाची गरज आहे.