Home गुन्हा दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरणारे जेरबंद

दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरणारे जेरबंद

0

पुणे-परवेज शेख दि 27/11/2019, वाकड पोलिस स्टेशन हद्दीत होणाऱ्या सोनसाखळी चोरीस प्रतिबंध करीत असताना कस्पटेवस्ती, चौक, डॉमिनरार मोटारसायकलवरून दोन इसम वाकडच्या दिशेने संशयास्पद रितीने जात असताना स्टाफच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यावरील इसम अरमान नानावत (वय २०, रा वढू खुर्द, ता. हवेली), धनराज शेरावत (वय १९, रा. सणसवाडी, जि. पुणे) यांना
मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचा एक साथीदार मंगलसिंग राजपूत (वय २०, रा. वढू बुद्रुक, जि. पुणे) यांनी मिळून वाकड पोलिस स्टेशन हद्दीत ४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

त्यांच्याकडून १०५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, डॉमिनआर
मोटरसायकल असा मिळून ४,८२,५००/- रूपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर करीत आहेत.


सदर कामगीरी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, अतिरीक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश माने, गुन्हेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहायक पोलिस निरीक्षक महेश स्वामी, हरिष माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलिस कर्मचारी जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, विक्रम जगदाळे, रमेश गायकवाड, बापुसाहेब धुमाळ, बिभिषण कान्हेरकर, सुरेश भोसले, नितीन ढोरजे, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, प्रमोद कदम, दिपक भोसले, सचिन नरूटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे यांनी केली आहे.