उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ३ जून : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन सौरव प्रकाश चव्हाण सोमवारी १ जून पासून बेपत्ता आहे. आई ने सांगितलेली दुधपिशवी आणण्यास घराबाहेर गेलेला तो अद्याप घरी परतला नाही.
दरम्यानच्या काळात त्याच्या कुटूंबीयांनी नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला मात्र त्याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी त्याचे वडील प्रकाश चव्हाण यांनी मंगळवारी २ जून रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.
- Advertisement -