हायलाइट्स:
- सलमान खानच्या ‘राधे’चं दुबाईमध्ये एडव्हान्स बुकिंग सुरू
- चित्रपटगृहांसह ऑनलाइनही रिलीज होणार ‘राधे’
- सोशल मीडियावर चर्चेत आहे या चित्रपटातील सलमानचा किसिंग सीन
सलमान खाननं आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून याची घोषणा केली. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘दुबईच्या चित्रपटगृहांमध्ये ‘राधे’च्या तिकिटांचं एडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. चित्रपटगृहात भेटू…’ सलमानचा हा चित्रपट चित्रपटगृहांस ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइनही रिलीज होणार आहे.
सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे’ येत्या १३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील २ गाणी रिलीज झाली आहेत. ज्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा किसिंग सीनसर्वाधिक चर्चेत राहिलेला होता. सलमान खान ऑनस्क्रीन किस करत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे अशा या चित्रपटातील दिशा-सलमानच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली. ज्यावर सलमाननं हा किसिंग सीन खरा असल्याचं म्हटलं आहे.
सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो या सीनबद्दल बोलताना दिसत आहे. सलमान म्हणाला, ‘या चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे पण दिशाला किस केलेलं नाही. मी सेलोटेपवर किस केलं आहे. अशाप्रकारे हा सीन शूट करण्यात आला आहे.’ सलमान खाननं दिशाचं कौतुक केलं आहे. दिशाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘दिशा खूप चांगली मुलगी आहे. तिनं चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला एकाच वयाचे आहोत असं दिसायचं होतं. पण ती माझ्या वयाची नाही तर मी तिच्या वयाचा वाटत आहे.’ खरं तर दिशा आणि सलमानच्या वयात खूप मोठं अंतर आहे.
सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. या आधी हे दोघंही ‘भारत’ चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर आता त्यांनी ‘राधे’मध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्याची जोडी कमाल करेल असंच वाटत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं असून सलमान खान आणि दिशा पाटनी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.