Home अश्रेणीबद्ध दुर्धर आजाराला कंटाळून वृद्धाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

दुर्धर आजाराला कंटाळून वृद्धाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

0

पुणे : परवेज शेख

वाकड: दुर्धर आजाराने ग्रासलेल्या एका वृद्धाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 12) दुपारी तीनच्या सुमारास दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.

परसराम बडगुजी भैसो (वय 84, रा. पार्कवेज सोसायटी, दत्त मंदिर रोड, वाकड) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसराम यांना एका असाध्य रोगाने ग्रासले होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी घरात कोणी नसताना बेडरूमच्या खिडकीतून उडी मारली. सोसायटीतील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले