दुष्काळग्रस्तांना फ्री मोबाइल रिचार्ज; पवारांचा खुलासा

- Advertisement -

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मोफत मोबाइल रिचार्जच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केलं आहे. ‘ही निव्वळ एक अफवा असून काही समाजकंटकांनी केलेली पीडित शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे, असा पवार यांनी म्हटलं आहे.  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मोबाइल शरद पवार यांच्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, असा संदेश सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. या संदेशावरून संभ्रम निर्माण झाल्यानं पवार यांनी स्वत: ट्विट करून त्याविषयी खुलासा केला आहे. ‘हा संतापजनक प्रकार आहे. काही समाजकंटकांकडून पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -