Home गुन्हा दुहेरी निर्घुण खून करणाऱ्या आरोपीला 12 तासाचे आत केले गजाड

दुहेरी निर्घुण खून करणाऱ्या आरोपीला 12 तासाचे आत केले गजाड

मिरारोड (मुंबई)|क्राईम रिपोर्ट प्रतिनिधी :- शफीक शेख

दिनांक 05/06/2020 रोजी श्री गंगाधर शिना पय्याडे वय – 63 वर्ष, राहणार शांतिनिकेतन ,505 अप्पर गोविंद नगर , मालाड पूर्व मुंबई यांनी खबर दिली होती की, त्यांचे मीरा रोड पूर्व येथील शबरी बार अँड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल असून ते सध्या लोकडाऊन मुळे बंद ठेवण्यात आले होते. सदर हॉटेलमधील कामगार त्यांचे मूळ गावी निघून गेल्याने सध्या मॅनेजर हरीश शेट्टी,मोरी कामगार नरेश पंडित व कल्लू यादव असे सदर ठिकाणी राहिलेले होते. मॅनेजर हरीश शेट्टी व मोरी कामगार नरेश पंडीत यांच्या डोक्यावर ,चेहऱ्यावर, गळ्यावर कोणत्यातरी अज्ञात हत्याराने दुखापती करून, त्यांना अज्ञात कारणावरून जीवे ठार करून त्यांच्या मृतदेह पुरावा नष्ट करण्याचे इराद्याने, हॉटेल मधील पाण्याचे टाकीत टाकून आरोपी कल्लू यादव हा पळून गेल्या बाबत दिलेल्या फिर्यादीवरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे नों. र. क्र. 124/2020 भा.द. वि. कलम 302 , 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपरोक्त दुहेरी खुनाचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब डॉ. श्री. शिवाजी राठोड, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, श्री संजय कुमार पाटील यांच्या आदेशान्वये आणि मीरा रोड विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री व्यंकट आंधळे, मिरा रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी वेग-वेगळी पोलिस पथके तयार केली होती. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने नमूद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.

सदर गुन्ह्यातील मयतांचे व संशयितांचे मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषना ,दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार यातील संशयित कल्लू यादव हा पुणे येथे असल्याची माहिती मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यात पोलीस उप निरीक्षक चेतन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वेळे, पो. हवा. अशोक पाटील, पो. ना. प्रदीप टक्के, मिरा रोड पोलीस स्टेशन मिरा रोड पोस्टचे पो.ना. दिवेकर, पो. शि. अनिल रावराणे अशी टीम पुणे येथे रवाना करण्यात आली होती . त्या अनुषंगाने संशयित आरोपी राजू यादव वय -35 वर्षे, मूळ रा. कंचनपुर पिंपरी, जि, महू , पोलीस ठाणे दोरीघाट, पोस्ट आमिला , राज्य उत्तर प्रदेश यांस साजन बार, पर्वती पायथा, निलायम ब्रिज जवळ पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे कसून विचारपूस करताना त्याने यातील मयत मॅनेजर हा स्वतः हॉटेल मधून चांगले जेवण मागून खात होता व आरोपी या खाऊ घालत होता त्यावरून त्यांच्यात बोलाचाली झाली असता मयत मॅनेजर हरीश शेट्टी व मोरी कामगार नरेश पंडीत यांनी आरोपीस मारहाण केली होती त्या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी यांनी दोघी मयत झोपेत असताना त्यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर माती खाण्याच्या फावड्याने वार करून त्यांना जिवे ठार मारून हॉटेल मधील पाण्याची टाकी टाकून मयताचे मोबाईल फोन घेऊन पळून गेला होता. आरोप त्याच्यावर कलकत्ता येथे खुनाचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये जेलमध्ये जाऊन आला आहे. तसेच स्वारगेट पोलिस ठाण्यात मारामारी व दारूबंदीचा गुन्हा दाखल आहे.


ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक साहेब डॉ. शिवाजी राठोड, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री. संजय कुमार पाटील यांच्या आदेशान्वये आणि मिरारोड विभागाचे पोलिस उप अधीक्षक श्री शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. व्यंकट आंधळे, मिरा रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीणकुमार साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. विलास कुटे , पोलीस उप निरीक्षक चेतन पाटील, स. फौ. अनिल वेळे , पो. हवा. अशोक पाटील, अर्जुन जाधव पो. ना. प्रदीप टक्के , संजय शिंदे , मनोज चव्हाण, पो. शि. राजेश श्रीवास्तव , गणेश वनवे पोलीस मित्र महेश कानविंदे, तसेच मिरा रोड पोलीस ठाण्याचे महिला सहा .पो. निरीक्षक तेजश्री शिंदे, पोलीस उप निरीक्षक सुरेश पाटील, प्रकाश कांबळे, महिला पोलीस उप निरीक्षक स्वप्नाली पालांडे, स्नेहल तांबडे, पोलीस हवा. काळूराम काळडोके, दिनकर गोसावी, पोलीस नाईक विकास सामने महेंद्र गिरासे, विजयेंद्र दिवेकर , प्रदीप बाविस्कर, सावंत ,पोलीस शि. तानाजी कौटे अनिल राणे , यांची अथक तपास करून दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील यशस्वी उकल केली आणि आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्हा उघडकीस आणला सदर पुण्याचा पुढील तपास मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कदम हे करीत आहेत.