दूध उत्पादक अवस्था आज अतिशय दयनीय झाली आहे . शेतकरी आज दूध संघामध्ये 20/22 लिटर रुपयाने दूध घालतोय . लॉकडाऊन मुळे दुधाची मागणी कमी झाली .

पिशवीबंद दुधाची मागणी देखील कमी झाली. लॉक डाऊन च्या काळामध्ये हॉटेल्स ,चहाच्या टपऱ्या बंद असल्यामुळे त्याचबरोबर दुधापासून बनणाऱ्या प्रॉडक्ट ची मागणी कमी झाल्यामुळे दुधाचे दर कमी झाले . यावर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित होते. शेतकरी वाचला तर देश वाचेल . भारत हा कृषीप्रधान देश असून त्याची ख्याती जगभर आहे . व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारकडून दहा रुपये अनुदान मिळावे व दूध संघाने ते 30 रुपये प्रति लिटर ने खरेदी करावें या मागणीला शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या मागणीला जीवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्याकडून जाहीर पाठिंबा.
🙏🏻कमलेश नवले पाटील
संस्थापक जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य(रजि क्र 126B)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.darshanpolicetime.com| आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । टूमबलर |लीन्केडीन | युट्यूब Copyright ©DarshanPoliceTime.Com | All rights reserved.