हायलाइट्स:
- सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सध्या घसरण झाली आहे. दोन्ही निर्देशांक सकाळी तेजीत होते.
- देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून केंद्र सरकारवर लॉकडाउनसाठी दबाव वाढत आहे.
- देशव्यापी लॉकडाउन अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता
सध्या सेन्सेक्स १०८ अंकांनी घसरला असून तो ४८६०९ अंकावर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४० अंकांच्या घसरणीसह १४५९४ अंकावर आहे. आज बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला होता तर निफ्टी ८० अंकांची वाढ झाली होती. मात्र करोना संकटाची तीव्रता पाहता बाजारातील वातावरण नकारात्मक बनले.
पेट्रोल-डिझेल महागले; निवडणुका संपताच कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा झटका
आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, ऑटो, एफएमसीजी या कंपन्याच्या शेअरला मागणी दिसून आली. तिमाही निकालात दमदार कामगिरी करणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये आज वाढ झाली आहे. त्याशिवाय एसबीआय, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा या शेअरमध्ये वाढ झाली. तर एचडीएफसी बँक, सन फार्मा, भारती एअरटेल, मारुती, इन्फोसिस आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे. निफ्टीवर रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे. आजच्या सत्रात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर निर्देशांकात १ टक्का वाढ झाली आहे.
एका रात्रीच भरमसाठ लस उत्पादन अशक्य; पुनावाला यांनी स्पष्ट केली लस निर्मितीपुढील आव्हाने
आज चलन बाजारात रुपयाने डॉलरसमोर १४ पैशांची वाढ नोंदवली आहे. तो ७३.८१ वर आहे. सोमवारी देखील रुपया १४ पैशांनी मजबूत होऊन ७३.९५ वर स्थिरावला होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २२८९ कोटींचे शेअर विक्री केले. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५५२ कोटीचे शेअर खरेदी केले.
सोमवारी भांडवली बाजारात मोठी घसरण झाली होती. पहिल्या सत्रात सेन्सेक्स ७५० अंकांनी कोसळला होता. मात्र त्यानंतर तो सावरला आणि दिवसअखेर तो ६३ अंकांच्या घसरणीसह ४८७१८ अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये किरकोळ ३ अंकांची घसरण झाली. काल अमेरिकेतील प्रमुख भांडवली बाजारात तेजी दिसून आली. डाऊजोन्स ०.७ टक्क्यांनी वधारला होता तर नॅसडॅक ०.४८ टक्क्यांनी घसरला. आज जपान आणि चीनमधील भांडवली बाजार सार्वजनिक सुट्टी निमित्त बंद आहेत तर सिंगापूरच्या निफ्टी फ्युचरमध्ये ३७ अंकांची घसरण झाली.
देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने ( covid 19 india ) वाढत असताना केंद्र सरकारवर लॉकडाउनसाठी दबाव वाढत ( pressure on government for complete lockdown ) चालला आहे. दुसरीकडे आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात लॉकडाउनची घोषणा केली आहे. बिहारमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात येत असल्याचं नितीशकुमार यांनी आज सोशल मीडियावरून जाहीर केलं आहे. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गोवा, कर्नाटक आणि झारखंडमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाउन घोषत करणारे बिहार हे देशातील ९ वे राज्य ठरले आहे.