देशी बनावटी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे बाळगणारा अटकेत

- Advertisement -

पुणे : परवेज शेख देशी बनावटी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे बाळगणारा अटकेत दिनांक 12/11/2019 रोजी पहाटे 3.10 वाजता सुमारास जुन्नर शहराचे पोलीस  पेट्रोलिंग करत असताना जुन्नर जुना एस. टी. स्टँड येथे एक इसम  संशयित  रित्या मोटर सायकल वर फिरताना दिसला .

त्याच्याकडे जाऊन अधिक चौकशी केली असता  त्याचे नावआदिनाथ दिलीप जाधव वय 21 वर्षें राहणार – जामगाव ता.गंगापूर  जि.औरंगाबाद    त्याची अंग झडती घेतली असता त्याचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्तुलपाच जिवंत काडतुसे मिळून आली तरी वरील मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करून, आरोपी मजकूर याची वैद्यकीय तपासणी करून, फिर्यादी जबाब देऊन मुद्देमालासह पुढील योग्य त्या कार्यवाही करीता जुन्नर पोलीस स्टेशन याचे ताब्यात दिला आहे.

- Advertisement -