देहुरोड मधील धक्कादायक घटना ,बलात्कार करून पिडीत मुलीस मारहाण..आरोपी मोकाट

- Advertisement -

देहुरोड ( प्रतिनिधी ) एका मुलीस दुचाकीवर बसवून घेऊन जाऊन बलात्कार संबधित पीडित मुलीस कमर पट्ट्याने मारहाण केला असल्याची घटना बुथवरी देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत घासली आहे .हा गुन्हा केल्या नंतर आरोपी फरार झाले असल्याची नोंद देहूरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती गुन्हेगार न लागल्याने पोलिसांच्या तपास कामा बाबत नागरिक शंका व्यक्त करू लागले आहेत.

१) साजन मन्नु मेहरा वय – २७ २)अनिकेत रणवीर झिंजोड वय-२२, ३)रोहन राजेंद्र टाक वय -१८ ( सर्व राहणार देहूरोड ) यांच्या विरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला .


देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पीडित मुलगी ही पाटील मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी पायी जात असताना आरोपी ,साजन मेहरा याने दमदाटी करून त्‍याच्‍या मोटरसायकलवर बसविले मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील झाडाखाली नेले आणि त्याठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला मोटरसायकलवर बसवून टि.सी कॉलनी विकासनगर मध्ये नेले . तेथे आरोपी साजन मेहरा , अनिकेत झिंजोड यांनी पीडीत मुलीस पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . तर रोहन टाक यास या घटनेचे चित्रीकरण करण्यास सांगितले असे पीडित मुळेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरनणी बुधवारी रात्री उशिरा या गुन्ह्याची नोंद करण्यात आली .संबधित आरोपी अध्यापही फरारी असून या प्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर हे करीत आहेत.पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -