Home ताज्या बातम्या देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीत ,चिंचोली येथे कोरोना संशयित रुग्ण आढळला …..

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीत ,चिंचोली येथे कोरोना संशयित रुग्ण आढळला …..

पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी )रमेश कांबळे

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील चिंचोलीगावात कोरोना बाधित संशयित रुग्ण आढळून आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या रुग्ण हा एकत्र कुंटुंब पद्धतीने राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुंटुंबातील १७ जणांना क्वांरंटाईन करण्यात आले असून त्यांच्याही रक्ताचे नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविन्यात आले आहेत . तर त्यांच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या चाळीस जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे .

चिंचोली गावातील संशयित रुग्ण हा कुठे बाहेर वैगेरे फिरायला गेलेला नव्हता .या बाबतीत खात्रीशीर माहिती आहे .परंतु सदरची व्यक्ती ही शुगरचा त्रास असल्याने खाजगी रुग्णालयात गेली होती. खाजगी रुग्णालयात केलेल्या तपासनियाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे , कोरोनाचा पॉझिटिव्ह आवाहल आल्याने , संबधित व्यक्तीला पुडील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .त्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.एनआयआर चा रिपोर्ट आल्यानंतरच खरी माहिती पुढे येणार आहे .वायसीएम रुग्णालयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला ,तर देहूरोड ,किवले विकासनगर भागातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा ९ होणार आहे . देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड आणि किवळे ,विकासनगर हद्दीत ,एक एक दिवस कोरोना पॉझिटिव्हरुग्ण मिळून येत असून संख्या वाढतच चालली आहे .देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड ,महानगरपालिका प्रशासन ,पोलीस प्रशासन ,आणि आरोग्य विभाग व अन्य कर्मचारी हे ही साखळी तोडण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत.परंतु नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत .फिरायला जात आहेत.आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. कोरोना सारखा विषाणू आपल्या दारात उभा असताना ,लोक त्याचे गांभीर्य घेत नाहीत.परिणामी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्या बद्दल देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी नाराजी व्यक्ती केली आहे . नागरिकांनी कृपा करून घराच्या बाहेर पडू नये,मास्क वापरावे , विनाकारण रस्त्यावर फिरू नये. असे आवाहन कल्याणकर यांनी केले आहे .