कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व पत्नी सारिका भेगडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते.
विठूनामाचा गजर आणि ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात सोमवारी (दि. 24) दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी देहू नगरी गजबजली. तत्पूर्वी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व पत्नी सारिका भेगडे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते
- Advertisement -