Home गुन्हा दोघा ट्रकांची समोरासमोर धडक एक ठार दोन जखमी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच

दोघा ट्रकांची समोरासमोर धडक एक ठार दोन जखमी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच

0

पारोळा : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सांगवी फाट्याजवळ दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनर ठार झाला तर दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाल्याची घटना दिनांक २७ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडल्याने महामार्गा वरील अपघाताची मालिका अदयाप सुरुच आहे


एरंडोल कडून येणारा ट्रक क्रमांक जी जे 25 यू 3934 या ट्रक ने पारोळ्या कडून एरंडोल कडे भरधाव वेगात धावणारा ट्रक क्रमांक एम पी 28 एच 1188 या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोघा ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने त्यात दगडु संतोष ब्राह्मणे वय 26 राहणारा शिवानी प्राणी मोती हायस्कूल जवळ जिल्हा शिंदवाडा मध्य प्रदेश प्रदेश हा क्लीनर जागीच ठार झाला तर राकेश यादव वय 40 राहणार शिंदवाडा मध्य प्रदेश तसेच समोरून येणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर संजय राठिया वय 20 ,राहणार पोरबंदर गुजरात हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेचे चालक ईश्वर ठाकूर यश ठाकूर शरद पाटील दीपक पवार कैलास चौधरी आदींनी रुगणालयात दाखल केले कुटीर रुग्णालयात डॉक्टरांनी प्रथम उपचार करून दोघे गंभीर जखमींना तात्काळ धुळे येथे हलविण्यात आले आहे दरम्यान हा अपघात इतका जबरदस्त होता की क्रेनच्या साह्याने दोघी वाहने वेगळी करून गाडीच्या कॅबिन तोडून या तिघाना आडिच तासाच्या अथक परिश्रमा नंतर बाहेर काढण्यात यश आले . दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल हेडकॉन्स्टेबल हेमचंद्र साबे आशिष चौधरी सागर कासार अरुण राठोड रवी पाटील मुन्ना पाटील सोनू पाटील यांनी परिश्रम घेतले तर डॉक्टर योगेश साळुंखे परिचारिका सोनाली गुरव शोभा बोरसे यांनी जखमींना प्रथमोपचार केले याबाबत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे