हायलाइट्स:
- वेब सीरिज ‘धूप की दिवार’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
- सोशल मीडियावर होतेय ‘धूप की दिवार’ ट्रेलरची चर्चा
- दोन देशांच्या शत्रूत्त्वात अडकलेली अनोखी प्रेमकथा
या वेब सीरिजची कथा पाकिस्तानी मुलगी आणि भारतीय मुलगा यांच्याभोवती फिरते. अभिनेता अहद रझा मीरनं या वेब सीरिजमध्ये विशाल नावाच्या भारतीय मुलाची तर अभिनेत्री सजल अलीनं सारा या पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली आहे. दोन देशांतील भांडणांमुळे देशांतील जनतेला कशाप्रकारे समस्यांना समोरं जावं लागतं आणि मोठं नुकसान सोसावं लागतं हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. दोन्ही देशांतील लोक एकामेकांनी स्वतःचे शत्रू समजू लागतात. पण जेव्हा सोशल मीडियावरून विशाल आणि सारा एकमेकांशी बोलतात. तेव्हा ते एकमेकांचं दुःखही समजू लागतात आणि तिथूनच सुरू होते या दोघांची लव्ह स्टोरी.
या वेब सीरिजमध्ये सजल अली आणि अहद रझा मीर यांच्या व्यतिरिक्त सामिया मुमताज, जैब रहमान, सावेरा नदीम, सामिना अहमद, मंजर सेहबाई, रजा तालिश , अली खान और अदनान जाफर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘धूप की दिवार’ ही एक पाकिस्तानी वेब सीरिज आहे. ही वेब सीरिज येत्या २५ जूनला ‘झी ५’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पण दोन्ही देशातील प्रेक्षक या वेब सीरिजवर कशा प्रतिक्रिया देतात याबाबत कमालीची उत्सुकता आहे.