दोन प्रेमी युगुलांना शिरपूर पोलिसांनी पकडले !

- Advertisement -

वाशिम: रिसोड येथून दोन प्रेमी युगुल पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना, शिरपूर पोलिसांनी १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर चौघांनाही मसलापेन ता. रिसोड येथून ताब्यात घेतले. यामधील एक प्रेमीयुगल अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 
अलिकडच्या काळात वाशिम जिल्ह्यात अल्पवयीन मुले बेपत्ता व पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा शोध घेताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता होण्याच्या घटना शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही घडत आहेत. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. १६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान रिसोड येथून एक अल्पवयीन प्रेमी युगुल व सज्ञान प्रेमी युगूल पळून जात असल्याची गुप्त माहिती रिसोड व शिरपूर पोलिसांना मिळाली होती. कार्यतत्परता दाखवित पोलीस प्रशासनाने तातडीने सूत्रे हलविली. या चारही जणांना शिरपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे व त्यांच्या सहकाºयांनी १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मसला पेन येथे ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

- Advertisement -