Home ताज्या बातम्या दोन बहिणींनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर चर्चा अफाट

दोन बहिणींनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर चर्चा अफाट

 वाराणसी:

उत्तर प्रदेशमध्ये सध्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. येथे दोन तरुणींनी एकमेकींशी लग्नगाठ बांधली. दोन्ही तरुणी चुलत बहिणी असून त्यांनी मंदिरामध्ये जाऊन लग्न केले. मंगळवारी हे अनोखे लग्न पार पडले आणि याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसीतील धागडबीर हनुमान मंदिरात दुपारच्या सुमारस जिन्स आणि टी-शर्ट घालून आलेल्या दोन तरुणींनी पुजाऱ्याकडे आपचे लग्न लावून द्या अशी मागणी केली. पुजाऱ्याने आधी नकार दिला, परंतु त्यांनी ही मागणी लावून धरल्यानंतर दबावात आल्याने त्याने होकार दिला. यानंतर दोघींनी एकमेकींनी हार घातले, मंगळसुत्र घातले आणि भांगेत कुकुही भरले. लग्नानंतर दोन्ही तरुणी निघून गेल्या. परंतु या दरम्यान उपस्थित लोकांनी याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.

एकमेकींशी लग्न केलेल्या तरुणींपैकी एक तरुणी कानपूरची तर दुसरी वाराणसीची रहिवासी आहे. मावशीकडे राहून शिक्षण घेत असताना तिच्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर दोघींनी लग्नाचा निर्णय घेतला, अशी माहिती पुजाऱ्याने दिली.