Home ताज्या बातम्या दौंडमुळे वाढतोय श्रीगोंद्याचा धोका

दौंडमुळे वाढतोय श्रीगोंद्याचा धोका

श्रीगोंदा -दौड शहरात जवान करोना बाधित आढळून आल्याने शेजारी असलेल्या श्रीगोंदा तालुक्‍यात करोनाचा वाढता धोका लक्षात घेवून तातडीने उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील गावे कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. आता पुढील 14 दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे.

दौड शहरात आठ करोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे शेजारी असलेल्या श्रीगोंदा तालुक्‍यात करोनाचा प्रादुर्भाव वाढ नये म्हणून निमगाव खलू, गार ही गावे दौड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहेत. त्याठिकाणी आधिक काळजी घेतली जात आहे. हायरिक्‍स म्हणून निमगाव खलू व गार ही गावे कंन्टेमेंट झोनमध्ये तर दौड शहरापासून पाच किलोमीटर आतील कौठा हे गाव बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांच्या सीमा लॉक करण्यात आल्या आहेत.

श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट केली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचारी तीन गावात तळ ठोकून आहेत. कौठा, खोरवडी बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद केली आहे. दौंडला कोणत्याच कामासाठी जाऊ नये, अशी दवंडी गार ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. काष्टी, श्रीगोंदा येथील डॉक्‍टरांनी दौडला रुग्ण पाठवू नयेत. चेकपोस्टवर कडक तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घराच्या बाहेर कोणी पडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.

दौंड येथील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक मधील जवान करोना संक्रमित झाले आहेत. यामुळे निमगाव खलू, गार या दोन गावांचा परिसर दिवसासाठी लॉक करण्यात आला आहे. या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. बाहेरील नागरिकांना या