Home ताज्या बातम्या दौंड पुन्हा हादरले; आणखी एकाला करोनाची बाधा

दौंड पुन्हा हादरले; आणखी एकाला करोनाची बाधा

दौंड: दौंड शहरात आणखी एकास करोनाची लागण झाल्याने दौंड पुन्हा हादरले आहे. शहरातील 70 वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि. 28) निष्पन्न झाले होते. त्याच्या संपर्कातील एकजण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

दौंड शहरातील करोनाचे सावट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.दौंड शहरातील एका व्यक्तीचा करोनामुळे बळी गेला असून त्यांच्या मुलाला करोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले होते. त्या मुलाच्या संपर्कातील 25 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 29) त्यांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून त्यातील एक करोना बाधित रुग्ण आढळून आला आहे, तर 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अशा आढळणार्‍या रुग्णांमुळे शहरातील करोनाची साखळी तुटण्याचे काही दिसत नसल्याने शहवासीयांना आत्ता खुप काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र शहरवासीय हे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.