हायलाइट्स:
- द कपिल शर्मा शो चा प्रोमो क्लिप रिलीज
- सर्व कलाकार दिसले जबरदस्त लुकमध्ये
- सुमोना चक्रवर्ती वगळता सर्व विनोदवीरांचा हजेरी
विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकने हा प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कृष्णाने लिहिले की,’ विनोदवीरांची ही गँग परत येत आहे. प्रोमो शूटचा पहिला दिवस. हा पहिला दिवस सगळ्यांसोबत खूप छान गेला. आता प्रतीक्षा संपत आली असून ही गँग तुम्हा सर्वांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.’ अभिनेत्री अर्चना पूरणसिंहने देखील हा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना तिने लिहिले, ‘ ड्रीम टीम आता परतली आहे. लवकरच भेटू या.’
सुमोनाचे चाहते नाराज
द कपिल शर्मा शो मध्ये आघाडीचे असे सर्व सातही विनोदवीर दिसत आहे. परंतु त्यात सुमोना चक्रवर्ती दिसत नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त करत तिच्याबद्दल विचारणा केली आहे. आगामी कार्यक्रमात ती आहे की नाही, असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. सुमोनाने कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वामध्ये सरला गुलाटी आणि दुसऱ्या पर्वामध्ये भूरीची भूमिका साकारली होती. कपिल शर्मा आणि सुमोना यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडली होती.
द कपिल शर्मा कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरन सिंह, कीकू शारदा. चंदन प्रभाकर, सुदेश लहरी आणि भारती सिंह दिसत आहेत. कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, हा कार्यक्रम नेमका कधीपासून प्रसारित केला जाणार आहे, याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे प्रेक्षकांना थोडावेळ वाट पहावी लागणार आहे.