हायलाइट्स:
- ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनची सोशल मीडियावर होतेय चर्चा
- ‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनला मिळाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
- निर्मात्यांनी सुरू केलीये ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची तयारी
एका हिंदी वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सीझन हा करोना व्हायरसच्या काळातीलच असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सीझनची कथा ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणार आहे. या सीझनमध्येही मनोज बाजपेयीसोबत शारिब हाश्मी आणि प्रियमणी मुख्य भूमिकांमध्ये असणार आहे.
रिपोर्टनुसार तिसऱ्या सीझनमध्ये भारताच्या विरोधात चीननं एक मिशन आखल्याचं दाखवण्यात येणार आहे. ज्याचं नाव ‘गुआन यू’ असं असेल. हे चीनच्या हान राजवंशातील एका मिलिटरी अधिकाऱ्याचं नाव होतं. ज्याला चीनमध्ये खूप महान मानलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि श्रीलंकानंतर आता श्रीकांत तिवारी आपल्या टीमसोबत चीनमध्ये गुप्त मिशन चालवणार आहे.
‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्ली आणि काश्मीर येथे झालं होतं. तर दुसऱ्या सीझनचं शूटिंग चेन्नई, लंडन, मुंबई आणि दिल्ली येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिसऱ्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्लीच्या व्यतिरिक्त नागालँड तसेच पूर्वेवकडील राज्यात करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.