मुंबई :अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून ३८ वर्षाच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४, ३५४(अ), ३५४ (ड) आणि पॉक्सो कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीला काल पोलिसांनी अटक केली आहे.
ऑक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान हा गुन्हा घडला असून पीडित तरुणी अल्पवयीन आहे. पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी असून आरोपीचे लग्न झालेले आहे. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षामध्ये बी. एच. एम. एस.चे शिक्षण घेत आहे.
ऑक्टोबर २०१७ पासून आरोपीने या तरुणीशी मैत्री करून तिला आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीचे लग्न झालेले असतानाही लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी या पीडित तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.