Home बातम्या आंतरराष्ट्रीय धक्कादायक! तब्बल १८ कुत्र्यांनी मालकालाच खाल्लं, हाडंही ठेवली नाहीत शिल्लक!

धक्कादायक! तब्बल १८ कुत्र्यांनी मालकालाच खाल्लं, हाडंही ठेवली नाहीत शिल्लक!

कुत्र्यांच्या इमानदारीची जगभरात उदाहरणे दिली जातात. पण अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कुत्र्यांनी असा काही कारनामा केला की, कुत्र्यांवर विश्वास ठेवावा का? असा प्रश्न पडू शकतो. टेक्सासमध्ये राहणारी एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. चौकशी, तपास केल्यानंतर असं आढळलं की, या व्यक्तीच्या १८ कुत्र्यांनीच त्याला खाऊन त्याचं अस्तित्व मिटवलं. मंगळवारी करण्यात आलेल्या डीएनए टेस्टमधून खुलासा झाला की, कुत्र्यांच्या विष्ठेत जे हाडांचे तुकडे सापडले ते ५७ वर्षीय फ्रेडी मॅक याचेच आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, मॅक फार आजारी होते. त्यामुळे हे अजून स्पष्ट झालेलं नाही की, कुत्र्यांनी त्यांना मारून खाल्लं की मृत्यूनंतर खाल्लं. मे महिन्यात मॅकच्या एका नातेवाईकाने त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या नातेवाईकांनी सांगितले की, एप्रिलपासून त्यांनी मॅकला पाहिले नाही.

मॅकचे नातेवाईक जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा कुत्र्यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. कुत्र्यांचं लक्ष भरकटवून जेव्हा अधिकारी घरात शिरले तेव्हा त्यांना मॅक आढळले नाही. त्यामुळे ते माघारी आले. पण त्यांना मनुष्याचे केस, हाडे आणि कपडे मिळाले. हाडांचे तुकडे त्यांनी डीएनए टेस्टिंगसाठी पाठवले, ज्यातून समोर आलं की ते मॅकचे आहेत.

डेप्युटी आरोम पिट्स यांनी सांगितले की, मिश्रित प्रजातीच्या या १८ कुत्र्यांनी मॅकचं कपडे आणि केसांसहीत संपूर्ण शरीर खाल्लं. कुत्र्यांनी २-५ इंचाच्या हाडांशिवाय काहीही  सोडलं नाही. मॅकच्या १८ कुत्र्यांपैकी दोघांना त्यांच्या साथीदारांनीच मारलं. तर उरलेल्या १३ कुत्र्यांना त्यांच्या आक्रामक व्यवहारामुळे मारण्यात आलं. तसेच तीन कुत्र्यांना दत्तक देण्यासाठी ठेवण्यास आलं आहे.