दरम्यान, बालिकेच्या घरच्यांनी कन्हैया हा तृतीयपंथीय नसून पुरुष असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत त्याच्या वडिलांना विचारले असता त्यांनीही तो पुरुषच असून गेल्या काही वर्षांपासून तृतीयपंथींच्या सहवासात राहत आहे. पैसे कमवायचा सोपा मार्ग म्हणून तो तृतीयपंथी बनल्याचे म्हटले जात आहे. गुन्हा दाखल करताना तो तृतीयपंथी आहे असे नमूद करण्यात आले आहे. मात्र याबाबतही वैद्यकीय सल्ला घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
धक्कादायक! तृतीयपंथीयांकडून तीन महिन्याच्या बालिकेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः चार दिवसांपूर्वी कफ परेडमध्ये हत्या करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या बालिकेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी एक तृतीयपंथी आणि त्याच्या साथीदार मित्राला अटक केली आहे.
- Advertisement -