धक्कादायक! भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार, नंतर गर्भपात; ११ जणांविरोधात गुन्हा

- Advertisement -

महाड : भावासह जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, एका तरुणीवर तीन महिने बलात्कार करणाऱ्या तरुणासह, त्याच्या दहा साथीदारांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी (२०) ही सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. याच गावातील तेजस झाडेने या तरुणीला आणि तिच्या भावाला मारण्याची धमकी देत, डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ आणि ७ ते ८ मार्च २०१९ या कालावधीत महाड शहरातील लॉजवर तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची अश्लील चित्रफित काढली. तिला मारहाणही केली. ती गर्भवती राहिल्यानंतर तेजसने बाळा पार्टे, विशाल मोरे यांच्या मदतीने वाई येथील रुग्णालयात गर्भपात केला.

तेजसला बाळा पार्टे, विशाल मोरे, योगेश मोरे, शशिकांत मोरे, साधना झाडे, राजेश झाडे (सर्व रा. वाडा, कुंभरोशी, सातारा), अनिश लांडगे (रा. उरळी कांचन, ता. पुणे), अमित दुधाणे (रा. खिंगर, पाचगणी), सोनू आणि एक अनोळखी महिलेनी मदत केली होती. वर्षभरानंतर तरुणीने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा गुन्हा महाड शहरात घडला असल्याने, महाबळेश्वर पोलिसांनी तो महाड शहर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

- Advertisement -