Home गुन्हा धक्कादायक ,मानवतमध्ये पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच निघाला मारेकरी

धक्कादायक ,मानवतमध्ये पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच निघाला मारेकरी

0

मानवत :-शेतात उसाला पाणी देण्यास गेलेल्या एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आल्याने दोन दिवसांपूर्वी मानवत तालूक्यात खळबळ उडाली होती. ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात गाजलेल्या मानवत खुन खटल्याची स्थानिकांना शेतात झालेल्या या खुनाने आठवण झाली अन् दोन दिवस भीतीचे वातारण निर्माण झाले होते. या संदर्भात मृतमहिलेच्या पतीने खुन झाल्याची मानवत पोलीसात फिर्याद दिल्यावर पोलिसांच्या तपासात धक्कादायकरित्या फिर्यादी पतीच पत्नीचा मारेकरी निघाला आहे .

पोलिसांकडून याविषयी मिळालेली माहिती अशी कि,दि. ३० जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील तुकाराम बाबुराव पिंपळे याने , नेहमीप्रमाणे दुपारी शेतात उसपिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या पत्नी आशामती तुकाराम पिंपळे (वय २९) हिस अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने जखमी करुन मारून टाकले आहे ,अशी फिर्यादी दिली होती .सदर प्रकरणी मानवत पोलीसांनी पोलीस ठाणे मानवत गु.रं.न ११ / २०२० कलम ३०२ भा.दं.वि प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन या प्रकरणाचा तपास स.पो.नि शिवाजी पवार यांच्याकडे सोपवला होता . घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ज्या शस्त्राने महिलेला मारण्यात आले ते शस्त्र आजूबाजूला आढळून आले नाही. फिर्यादी पतीला त्याच्या घराची चावी मागितली असता, ती हरवली असल्याचे त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले . तुकाराम पिंपळे याने यावेळी आंघोळ करून कपडे बदलल्याचे व अंगावर नवीन बनियान घातल्याचे

पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा संशय तुकाराम पिंपळे याच्यावर बळावला होता .दरम्यान चौकशी मध्ये पोलिसांनी खाक्या दाखवताच धारदार शस्त्राने वार करुन ठार मारलेला अज्ञात इसम हा दुसरा तिसरा कुणी नसुन मयत स्त्रीच्या खुनाची फिर्याद देणारा तीचा पती तुकाराम पिंपळे हाच असल्याची माहिती उघड झाली. यावेळी त्याच्याकडून गुन्हात वापरलेले धारदार कोयते जप्त करण्यात आले असुन अटक करण्यात आली असल्याचीही माहीती स्थानिक पोलिसांनी दिलीय .
सदरचा तपास पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय , अपर पोलीस अधीक्षक श्री आर रागसुधा , उप.वि.पो.अ सेलू एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी पवार ,सहा.पोऊनि ताठे, शेख गौस, पोहेकॉ. दीपक वाव्हळे, हनुमान पावडे, मगर आदींनी केला आहे .