Home गुन्हा धक्कादायक! विरारमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून चोरले लाखोंचे दागिने

धक्कादायक! विरारमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून चोरले लाखोंचे दागिने

धक्कादायक! विरारमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून चोरले लाखोंचे दागिने 

ठळक मुद्देसाहिल नगर मधील साहिल बिल्डिंगमधील सदनिका नंबर ५ मध्ये व्यापारी श्याम दीनदयाल गुप्ता (७०) हे पत्नी उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांच्यासोबत राहतात.चोरट्यांनी घरात प्रवेश करून धारदार हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून गंभीर दुखापत करून उमादेवी यांची निर्घृणपणे हत्या केली
नालासोपारा: विरार पूर्वेकडील इमारतीमध्ये काल संध्याकाळी ५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून ५० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून घरामधील बेडरूमच्या कपाटामधून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विरारपोलिसांनी हत्येचा आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

विरार पूर्वेकडील चंदनसार रोडवरील कोपरी नाका येथील तांदूळ बाजारसमोरील साहिल नगर मधील साहिल बिल्डिंगमधील सदनिका नंबर ५ मध्ये व्यापारी श्याम दीनदयाल गुप्ता (७०) हे पत्नी उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांच्यासोबत राहतात. बुधवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उमाराणी ह्या एकट्या घरात असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून धारदार हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून गंभीर दुखापत करून उमादेवी यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर बेडरूमच्या कपटामधून ८० हजार रुपये रोख रक्कम, ९० हजारांच्या दोन सोन्याच्या चैनी, १५ हजारांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांचे २० ग्रॅम सोन्याचे गंठण, ३० हजारांचे १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके, १५ हजारांची ५ ग्रॅम सोन्याची बिंदीया, ३० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांचे २५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या पायातील पैंजण असा एकूण ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे.