Home अश्रेणीबद्ध धनकवडी परिसरात तब्बल १७ तास वीज गायब

धनकवडी परिसरात तब्बल १७ तास वीज गायब

धनकवडी : कोणत्याही हलगर्जीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्यावर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी करून काही तास उलटतात तोच धनकवडी परिसरातील पंचवटी भागात थोडे थोडके नव्हे १७ तास वीज गायब होती. त्यामुळे ऊर्जामंत्र्याच्याच आदेशाची बत्ती गुल झाली असल्याची टीका त्रस्त नागरिकांनी केली.

मंत्र्यांच्या आदेशानंतर लगेचच असे प्रकार समोर येत असतील तर खरच कारवाई होणार का असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरात रोहित्रामधील बिघाडाचे कारण देऊन तब्बल १७ तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. सकाळी ७ वाजता अचानक खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १२ वाजता अखेर सुरळीत झाला. 

 रोहित्रातील बिघाड हेच कारण…
महावितरणच्या पद्मावती विभागाचे कार्यकारी अभियंता मधूसुदन बरकडे  म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर रोहित्रामधील बिघाड दुरुस्तीचे काम सुरू होते. रिंग मेन युनिटमधून चव्हाणनगर परिसरात.पयार्यी वीज पुरवठा करण्यात आला. मात्र पंचवटी सोसायटीसाठी ती व्यवस्था करता आली नाही. रोहित्राचे काम करणे गरजेचे होते.