धबधब्यावर फिरायला गेलेली पाच तरुण मुलं पाण्यात बुडाल्या

- Advertisement -

डी.पी. टी. प्रतिनिधी :- शफीक शेख

दिनांक २ जुलै २०२० रोजी काळमांडवी धबधबा ता.जव्हारपासून सात किमी अंतरावर केळीचा पाडा (काळशेती) येथील धबधब्यावर फिरायला गेलेली पाच तरुण मुलं पाण्यात बुडाल्याचे वृत्त आहे. हे पाचही जण जव्हार येथील अंबिका चौक भागातील रहिवासी आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाच मुले डोहात बुडून मयत झालेले यांचे नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. देवेंद्र गंगाधर वाघ
वय- २८

२. प्रथमेश प्रकाश चव्हाण
वय-२०

३.देवेंद्र दत्तात्रय फलटणकर
वय:१९

४. निमेश नरेश पाटील
वय-२८

५. रिंकु अतुल भोईर
वय-२२

सर्व रा. जव्हार येथील रहिवाशी आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

- Advertisement -