Home ताज्या बातम्या धाराशिव जिल्हा : एकाच दिवशी कोरोनाचे 2 बळी

धाराशिव जिल्हा : एकाच दिवशी कोरोनाचे 2 बळी

धाराशिवमध्ये शुक्रवार घातक ठरला असून कोरोनामुळे जिह्यात एकाच दिवशी दोन बळी गेले आहेत. उमरगा तालुक्यातील बेगडा येथील एका तर धाराशिव तालुक्यातील कोंड येथील एका वृध्दाचा शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोन्ही व्यक्ती मुंबईहून परतल्या होत्या. जिह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र, शुक्रवारी जिह्यात कोरोनामुळे दोन बळी गेले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवारी जिह्यातील 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. उमरगा तालुक्यातील बेगडा येथील हा रुग्ण मुंबईतील कांदिवलीहून कुटुंबासह गावी आला होता. त्यांच्यावर उमरगा येथील कोवीड रुग्णालयात उपचार सुरु होते. ते मुधूमेह, उच्चरक्तदाब यासह अन्य आजारानेही त्रस्त होते. शुक्रवारी रात्री उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच धाराशिव तालुक्यातील कोंड येथील एका वृध्दाचा कोंडहून धाराशिवकडे येताना मृत्यू झाला आहे. त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. जिह्यात आतापर्यंत कोरोनाचे 64 रुग्ण आढळून आले असून 15 जण बरे झाले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या 47 रुग्णावर उपचार सुरु आहेत.