Home ताज्या बातम्या धुळे तालुक्यातील वडजाई येथील शाळा परिसर झाला मद्यपींचा अड्डा

धुळे तालुक्यातील वडजाई येथील शाळा परिसर झाला मद्यपींचा अड्डा

0

वडजाई (ता. धुळे) :येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा भरते शाळा तर सायकांळी या शाळेच्या पंटागणात दारुड्यांची शाळा भरते. शाळेलगतच दारूअड्डे असल्याने, अनेक मद्दपी रात्री शाळेच्या पटांगणातच मद्दप्राशन करीत असतात. सकाळच्यावेळी पटांगणात गावठी दारूच्या बाटल्या, ग्लास पडलेले असतात. मोहाडी पोलिसानी दारूड्यांचा त्वरित बदोबस्त करावा अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांनी केलेली आहे.
तालुक्यातील वडजाई येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेला मोठे पटागण आहे. मात्र हे पटांगण सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. संपूर्ण पटांगणाला संरक्षक भिंत नाही. या शाळेच्या आजुबाजुला गावठी दारूअड्डयांचा वेढा पडला आहे. अगदी शाळेलगतच गावठी दारूचे अड्डे असल्यामुळे रात्री दारु पिणारे या अडयावरून दारुच्या पोटली घेतात व शाळेच्या ओटयावर बसुन सर्रास दारु पित बसतात. मद्यप्राशनानंतर पिशवी, दारूची बोटल. ग्लास तेथेच सोडून निघून जातात. त्यामुळे सकाळी शाळेत येणाऱ्या लहान मुलांवर त्यांचा विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या आवारातच ग्रामपंचायत कार्यालय आहे, बालवाडी आहे. दिवसा या शाळेच्या परिसरात बराच वावर असतो परंतु रात्री आधाराचा फायदा घेऊन रात्री जणु बेवडयांची शाळाच भरत असते. जि प शाळेची शालेय समिती फक्त कागदावरच उरली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेला संरक्षक भिंत बांधावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आह. परंतु मराठी शाळेकडे वरिष्ठ अधिकारीच दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी या दारूड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केलेली आहे.
शाळेचे प्रवेशद्वारही तुटलेले
दरम्यान शाळेला असलेले प्रवेशद्वारही तुटलेले आहे. त्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती झालेली आहे. शाळेचे प्रवेशद्वार नवीन बसविण्यात यावे तसेच संरक्षक भिंत बांधावी अशी मागणीही आता होऊ लागलेली आहे.