धुळे : पोलीस स्वप्निल चौधरी यांनी सांगली व कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी केली 40 हजार ची मदत

- Advertisement -

धुळे : मुडी येथेही पोलीस जवान स्वप्नील चौधरी याने आपल्या राज्य राखीव बल धुळे तसेच बॅच २०१७ व बाहेरील शाळा,कॉलेज गावकरी तसेच संपर्कात असलेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील मित्र परिवार बंधु-भगिनी न कडुन फोन पे गुगल पे च्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले व या आवाहना ला उदंड प्रतिसाद मिळाला.यता शक्ती प्रमाणे मित्रपरिवाराने ५०,१००,२०० ५०० अशी मदत केली असे दोन दिवसात चाळीस हजार रु जमा केले.
राज्यात कोल्हापूर सांगलीत पुराचे थैमान घातले आहे आजवरच्या इतिहासात इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती त्या भागाने कधी बघितली नव्हती महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या पूरग्रस्तांचे अश्रु पुसण्यासाठी मुडी येथिल एस आर पी पोलीस स्वप्नील चौधरी याने आवाहन केले होते.गरिबीची जाणीव असलेला स्वप्नील चौधरी याने आज उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले. या बद्दल स्वप्नील याचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे आणि खरोखरच त्या पैशांचा उपयोग पूरग्रस्तांसाठी झाला पाहिजे म्हणुन स्वतः अन्न पदार्थ कपडे जीवनावश्यक वस्तु घेऊन कोल्हापूर व सांगली जाणार आहे.

- Advertisement -