Home गुन्हा धुळे : 26 तासानंतर संदीप पाटीलचा मृतदेह लागला हाती !

धुळे : 26 तासानंतर संदीप पाटीलचा मृतदेह लागला हाती !

0

धुळे : काल दुपारी 3 पासुन अरुणावती नादीवरील बंधाऱ्यात संदीप पाटील हा 18 वर्षीय तरुण बुडाला होता. SDRF चे जवान काल रात्री उशिरापर्यंत पाण्यात या तरुणाचा शोध घेत होते. आज पुन्हा सकाळ पासून SDRF जवानांनी शोध कार्य सुरू केले होते. तब्बल 26 तासांनंतर या युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगत वरती आला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता. शेवटी या तरुणाचा मृतदेह हाती लागल्याने आई, बहिणीने एकच हंभरडा फोडला. एकुलता एक मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.