Home बातम्या राष्ट्रीय धोनीची काश्मिरात नेमणूक; लष्करात गस्त घालणार

धोनीची काश्मिरात नेमणूक; लष्करात गस्त घालणार

नवी दिल्ली:  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा लष्कराच्या गणवेशात दिसणार आहे. त्याची काश्मीरमध्ये नेमणूक झाली आहे. ३१ जुलैला तो १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) रुजू होणार असून, तो गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सहभागी होणार नसून, या दरम्यान लष्करात सेवा बजावणार असल्याचं धोनीनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल (मानद) धोनीची लष्करानं काश्मीरमध्ये नेमणूक केली आहे. काश्मीरमधील १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) तो सहभागी होईल. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत तो व्हिक्टर फोर्समधील जवानांसोबत तो प्रशिक्षण घेईल. धोनी गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे. 

भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर असेल. या दौऱ्यात धोनीच्या जागी युवा क्रिकेटपटू रिषभ पंत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.