Home बातम्या राष्ट्रीय धोनीसाठी आम्रपालीने केली पैशांची अफरातफर!

धोनीसाठी आम्रपालीने केली पैशांची अफरातफर!

नवी दिल्ली:आम्रपाली ग्रुपला क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याची तीन दिवसांची वेळ मिळावी या साठीच आम्रपाली ग्रुपने रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या धोनीच्या कंपनीला ६. ५२ कोटी रुपये दिल्याचे फॉरेन्सिक ऑडिटर्सने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या महेंद्रसिंह धोनी याच्या कंपनीशी करार करताना आम्रपाली ग्रुपने ही अट ठेवली होती. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसिडर होता. आम्रपाली प्रकरणात ६. ५२ कोटी रुपये

आम्रपाली ग्रुपने अवैध पद्धतीने वळते केलेले ६ कोटी ५२ लाख रुपये घर खरेदीदारांचे होते. हे पैसे वसूल केले गेले पाहिजेत असे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे. सन २००९ ते २०१५ दरम्यान आम्रपालीने रिती स्पोर्ट्सला ६. ५२ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम एका कराराअंतर्गत दिली गेली होती. 

क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी रिती स्पोर्ट्सच्या प्रतिनीधींसह आम्रपाली ग्रुपचे सीएमडींसाठी उपलब्ध होतील, असे २४ नोव्हेंबर २००९ या दिवशी झालेल्या करारात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, गृह खरेदीदारांचे पैसे ज्या ज्या कंपन्यांनी घेतले असतील त्या सर्व कंपन्यांनी एका महिन्याच्या आत हे पैसे परत करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले. या बरोबरच ‘फेफा’च्या उल्लंघनाबाबत ईडीने चौकशी करावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

अवैध मार्गाने वळवण्याचे प्रकरण सध्या गाजते आहे.