Home बातम्या आंतरराष्ट्रीय नंदीग्राममध्ये पराभवानंतरही ममता मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या नियम…

नंदीग्राममध्ये पराभवानंतरही ममता मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या नियम…

0
नंदीग्राममध्ये पराभवानंतरही ममता मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या नियम…

[ad_1]

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्यत्व गरजेचं
  • मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांत सदस्यत्व मिळवणं गरजेचं
  • ममता बॅनर्जी कसा सोडवणार हा पेच?

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा ‘खेला’ यशस्वी ठरलाय. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सगळ्या आशा-आकांशा अपूर्णच राहिल्यात. तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरलाय. तर पश्चिम बंगालमध्ये सहजच बहुमत मिळवत राज्यात तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन होणार हे आता निश्चत असलं तरी राज्यात मुख्यमंत्रीपदाचं काय होणार? याची चर्चाही जोर धरू लागलीय.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ तर भाजपला ७७ जागांवर विजय मिळालाय. असं असलं तरी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता त्या मुख्यमंत्रीपदी कशा विराजमान होणार? या प्रश्नावर ममतांना उत्तर शोधावं लागणार आहे.

वाचा : विधानसभा निवडणूक २०२१ : कोण जिंकलं? कोण पराभूत? चर्चित चेहरे

Assembly Elections 2021: तृणमूल काँग्रेसच्या ‘दिवंगत’ उमेदवारानं जिंकली विधानसभा निवडणूक!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री – तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांचा त्यांचेच एकेकाळचे सहकारी – भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १७३६ मतांनी पराभव केलाय.

ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषद (राज्यातील वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह) या दोहोंपैंकी एकाचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री शपथ घेताना दोन्ही सभागृहांपैंकी एकाही सभागृहाचे सदस्य नसतील, तर शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं आहे. यात मुख्यमंत्र्यांना अपयश आलं तर त्यांना मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यातच पद सोडावं लागू शकतं.

Oxygen Crisis: कर्नाटकात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Covid19: देशात २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ रुग्ण दाखल, ३४१७ मृत्यू

[ad_2]

Source link